Devendra Fadnavis | ‘एकाचवेळी औरंगजेब व टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर प्रकरणाच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. असा प्रकार एकाचवेळी दोन जिल्ह्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हे काही सहज झालेले नाही. विरोधी पक्ष दंगली (Riot) घडतील, दंगली घडतील असे सांगत आहेत. औरंगजेब (Aurangzeb) आणि टिपू सुलतानचे (Tipu Sultan) उदात्तीकरण हे योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहाणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी फडणवीस बोलत होते.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1666296705397182464?s=20

निवडणुका आल्यावर पवार असे प्रयत्न करतात

शरद पवार (Sharad Pawar) हे निवडणुका आल्या की असे प्रयत्न करतात. 2014 मध्ये आपण पाहिले. आज ते बोललेत तेच ते 2014 मध्ये बोलले होते. त्यात आणि आजच्या बोलण्यात जराही फरक नाहीय. 2019 मध्ये ही ते बोलले होते. आता शरद पवारांची आम्हाला सवय झाली आहे. मोदींविरोधात देशात वातावरण दिसत आहे ते 2019 मध्ये म्हणाले होते. त्याच मोदींचे (PM Narendra Modi) 300 पेक्षा जास्त खासदार (BJP MP) निवडून आले होते, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

काय म्हणाले शरद पवार?

Advt.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुरात काल घडलेल्या घटनेवर काल
लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धर्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांतील लोकच रस्त्यावर उतरले तर ते
योग्य नाही. त्यातून दोन समाजामध्ये कटुता निर्माण होते हे चांगले लक्षण नाही, असे पवार म्हणाले.

Web Title :  Devendra Fadnavis | exaltation of two districts aurangzeb tipu sultan at the same time is not a coincidence devendra fadnavis ok kolhapur status issue marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला