Devendra Fadnavis | ‘सरकार ज्या दिवशी पडेल तेव्हा कळणारही नाही, पण..’, – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | सरकार पाडून दाखवा असं हे रोज म्हणतात. ज्या दिवशी सरकार पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही, असं माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. अनेक विविध पैलुवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी शनिवारी फडणवीस हे माध्यमांशी बोलत होतो.

 

 

काय म्हणाले फडणवीस?
काल (शुक्रवारी) शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संवाद साधला. तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “सरकार पाडून दाखवा असं हे रोज म्हणतात. ज्या दिवशी सरकार पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही,” उद्धव ठाकरे हे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. परंतु त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे? शिवसेनेकडे जेव्हा उमेदवार नव्हता त्यावेळी भाजपनं त्यांना उमेदवार दिला होता, पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. कोलकात्याची आजची अवस्था काय आहे हे ठाऊक आहे का?, जो तुमच्या विरोधात बोलतो त्याचं मुंडकं छाटून फासावर लटकवायचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब आहे तोवर आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, अस देखील फडणवीस म्हणाले.

दरम्यान, CBI, ED सारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा विरोधच आहे.
ते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात जसा सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला तसा भाजप करणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय शांतही बसणार नाहीत. परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे
त्यांनी भीती बाळगावी आणि ज्यांनी केला नाही त्यांनी निश्चिंत राहावं.
जर आम्ही संस्थांचा गैरवापर होत असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आता तुरुंगात असतं, अस फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | former cm devendra fadnavis commented when mahavikas aghadhi government fall cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | ‘या’ ग्रीन एनर्जी शेयरने भरली गुंतवणुकदारांची झोळी, एका वर्षात दिला 42 पट रिटर्न

Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार

Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’