Devendra Fadnavis | ‘…तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही’ – ठाकरे सरकारला फडणवीसांचा इशारा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात गुलाब चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांना याचा जोरात फटका बसला. मराठवाड्यात तर अधिक नुकसान झालं आहे. या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी नांदेडमधील (Nanded) चिवली आणि फुलवाल भागात पाहणी दौरा केला. सत्य परिस्थिती सरकारला (Thackeray Government) समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला असल्याचं फडणवीस म्हणाले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भयानक अशा प्रकारची अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खूप मोठं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. दौरा करताना विम्याचे, अनुदानाचे पैसे मिळत नाहीत, कर्ज वसुलीचा तगादा लावण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय चाललाय. आपलं सरकार होतं तेव्हा नियमित विम्याचे पैसे द्यायचो. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला 800 कोटी रुपये दिले. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. या सरकारच्या (Thackeray Government) पाठीमागे लागू. हे सरकार झोपलेलं आहे. या सरकारला जागे करण्याकरता आम्ही निघालो आहोत. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरचा संघर्ष सुरुच ठेवू, असं ते म्हणाले.

दरम्यान, पुढे देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणीही राज्य सरकारकडे (Thackeray Government) केलीय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे मागील 3 दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करीत आहेत.

Web Title :- Devendra Fadnavis | former cm devendra fadnavis warning thackeray government during inspection of heavy rains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Italy Plane Crash | मोठी दुर्घटना ! विमानाची इमारतीला धडक; एका चिमुकल्यासह 8 जण ठार

Aryan Khan Drug Case | आर्यन खानच्या अडचणीत वाढ? मोबाईलमध्ये आक्षेपार्ह तपशील समोर

Vasai Virar News | वसईत 2 हजारच्या नोटांचा पाऊस…अन् गर्दीचा महापूर