Devendra Fadnavis | शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय अस्तित्वच नाही; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गोवा राज्यातील निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) धुरा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीने फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) जोरदार निशाणा साधला. तसेच गोव्यात पुन्हा भाजपचं (BJP) सरकारच असेल असा विश्वासही व्यक्त केला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ”कोणतीही निवडणूक कमकुवत आहे असे आम्ही मानत नाही. गोव्यातही तेच आहे. पण कोणासोबत लढायचं आहे हे बाकी राहीलं आहे. कारण विरोधी पक्षच आपापसात मोठं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा कोणासोबत लढायच हे पक्क झाल की पुढचे विश्लेषण करणे सोपे होईल. दरम्यान त्यांनी, राष्ट्रवादी (NCP) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले की, पवारांचा राष्ट्रवादी असा पक्ष आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाए उसके जैसा’. ते कधी सपा शी तर कधी टीएमसी शी संवाद साधतात. राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष नसून त्याला राष्ट्रीय अस्तित्व नाही. विचार नाहीत. राष्ट्रवादी नाव असल तरी तो पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या पक्षाला ते दाखवणे गरजेचं आहे. त्यांनी थोड्या जागांवर जरी लढायचे ठरवले तरी त्याचा कोणालाही फायदा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणतेही पक्ष एकत्र येऊ शकतात,पण आताची परिस्थिती पहिली तर त्यांना कोणताही पक्ष बरोबर घेईल असे वाटत नाही, असे सांगतानाच फडणवीस म्हणाले की, ”ज्यांनी पक्ष सोडला त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे माहित होते.
जनता तुमच्या विरोधात असल्याचे त्यांना विश्वासात घेऊन सांगितले होते. परंतु आजकाल कोणालाही थांबायचे नसते.
भाजपकडून मायकल लोबो (Michael Lobo) यांनी राजकारण केलं. भाजपमुळेच ते मंत्री झाले.
त्यांना सर्व पदे दिली गेली. त्यांची एक मागणी होती कि त्यांच्या पत्नीला तिकिट देण्याची.
पण जे सातत्याने निवडून येत आहेत त्यांना बाजूला सारून लोबो यांच्या पत्नीला तिकीट देणे हे मान्य नव्हते.
भाजपात असतानाही लोबो हे काँग्रेसला मदत करायचे यापूर्वीही निवडणुकीत त्यांनी मदत केली होती.
त्यामुळे पक्ष सोडून जाताना आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title : Devendra Fadnavis | former maharashtra cm devendra fadnavis targets ncp chief sharad pawar and goa assembly election 2022

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा