‘पावर’मध्ये असताना भाजपनं केले शरद पवारांसह ‘या’ दिग्गजांचे फोन ‘टॅप’ ? गृहमंत्रालयाचे चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने ‘भाजप’ला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. भाजप सरकार असताना विरोधी पक्षांचे ‘फोन-टॅप’ केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी अशा प्रकारचा आरोप केला होता. त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाने हे आदेश देण्यामागचे कारण सांगितले जात आहे की भाजपची सत्ता असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केले गेले होते.

अशी चर्चा कायम असते की राजकारणात विरोधी पक्षांत काय सुरु आहे याची खबर काढून घेण्यासाठी अशा प्रकारचे फोन टॅप केले जातात. राज्य पोलिसांच्या सायबर सेलकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

केंद्रात यूपीए काँग्रेसचे सरकार असताना देखील भाजप नेत्यांकडून असे आरोप करण्यात आले होते. सरकारकडून अशा प्रकारे हेरगिरी करणं गंभीर मानलं जातं. नियमानुसार पाहिले तर फक्त न्यायालयाच्या परवानगीनुसार अशा प्रकारे फोन टॅपिंग केले जाते. राजकारणासाठी फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. परंतु आता गृहमंत्रालयाच्या निर्णयामुळे तपासात तथ्य निघाले तर भाजप नेते अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे.

फेसबुक पेज लाईक करा –