Devendra Fadnavis | HM अमित शाह आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट होणे नाहीच, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | गणेशोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) 5 सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. यानिमित्ताने ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतील, अशी चर्चा राजकीय गोटात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections 2022) ठाकरे विरूद्ध ठाकरे (Uddhav Thackeray Vs Raj Thackeray) सामना रंगवून निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा विचार आहे. त्यादृष्टीने आताच भाजपा नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, अमित शहा हे राज ठाकरे यांची भेट घेणार किंवा नाही यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Devendra Fadnavis)

 

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे-शाह भेटीबद्दल म्हटले की, अमित शाह हे दर गणेशोत्सवात मुंबईला येतात. काही गणपतींचे दर्शन घेतात. यावेळी ते लालबागचा राजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) तसेच माझ्याकडील गणपतींचे दर्शन घेतील. भाजप पदाधिकार्‍यांशी चर्चा करतील. इतर कोणताही कार्यक्रम नाही, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे व शाह भेट होणार नसल्याचे स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना जेरीस आणण्यासाठी करत
असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन आहे.
कामाला कामाने उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा असे होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्याप्रकारे कामे केली आहेत,
त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी विकासाची एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचे काम विरोधकांनी करावे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Home Minister And BJP Leader amit shah MNS Chief raj thackeray will not meet says devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Narottam Mishra | भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान; म्हणाले; ‘शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | ट्रॅफिक जाममुळे कारचालकाची PMPML बसचालकाला मारहाण; शिवीगाळ करणार्‍या कटके कुटुंबियांवर गुन्हा दाखल

 

Governor Appointed MLA | उध्दव ठाकरेंना धक्का ! राज्यपाल कोश्यारींकडून ‘महाविकास’च्या 12 आमदारांची यादी अखेर रद्द