Devendra Fadnavis | ‘…तेव्हाच मला राग येतो’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिवाळीनिमित्त पत्रकार परिषद घेत पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य करताना विरोधकांवर टीका देखील केली.

मी सागर बंगल्यावर खूश आहे. येथे खूप सकारात्मकता आहे. राज्यमंत्री लवकर केले जातील. राज्यमंत्री लवकर केले नाहीत, तर राज्यकारभारावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कधी झोपतात, हा संशोधनाचा विषय आहे. कारण दिवस असो वा रात्र मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना नेहमी हजेरी लावतात, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

सध्या राजकारणात कटुता वाढली आहे. आणि हे वास्तव आहे. डोक्यावरील केस गेले याचा अर्थ तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगले काम केले. माझ्याकडे खूप सहनशक्ती आहे. गेली 25 वर्षे तुम्ही पाहिले असेलच. दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल जर चांगले लिहिले असेल, तरच मी तो अंक वाचतो. आमचा पायाभूत सुविधांवर अधिक भर आहे. मुंबादेवी मंदिरात (Mumba Devi Temple, Mumbai) कॉरिडोर उभारणार आहोत, असे यावेळी फडणवीसांनी सांगितले.

2019 च्या निवडणुकांआधी राज्यात शिवसेना-भाजप युतीची (Shiv Sena-BJP Alliance) सत्ता होती.
त्यावेळी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी विधानसभेत फडणवीसांनी मी पुन्हा येईन, असे ओरडून म्हंटले होते.
त्यानुसार ते पुन्हा आले नाहीत. आले पण त्यांना दुय्यम म्हणजे उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister)
स्वीकारावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) त्यांच्यावर नेहमी विनोद करत असते.
तसेच मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस पहिले आहेत, त्यामुळे देखील त्यांची चेष्टा होते.
त्यावर त्यांनी खुमासदार उत्तरे दिली. मला त्याचा राग येत नाही, पण मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मला राग
येतो, असे फडणवीस म्हणाले.

Web Title :- Devendra Fadnavis | i get more angry when im hungry says devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitabh Gupta On Traffic Police | पोलिस आयुक्तांच्या रडारवर वाहतूक अमलदारही; विशेष पथकांचा ‘वॉच’

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का