Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा, म्हणाले – ‘आम्हाला मदत करणार्‍या आमदारांचं तुम्ही वाकडं करू शकत नाही, कारण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यसभेच्या (Rajya Sabha elections) तीनही जागा जिंकून भाजपने (BJP) राज्यातील आघाडील सरकारला एक इशारा दिला आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपने तिन्ही उमेदवारांचा सत्कार केला आहे. त्यावेळी भाजपचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) गर्भित इशारा दिला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते,’ असं फडणीसांनी म्हटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहितीये, असा दावा मविआतील काही नेत्यांनी केला. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे मविआ आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच. पण त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील.” असं ते म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, “2019 साली मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने सेना-भाजपला क्लिअर मॅन्डेट दिलं होतं.
पण, या सत्तेचा अपमान झालं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा.
एकतरी चांगलं काम करुन दाखवा. अडीच वर्षाचा काळ गेला, परंतु, दाखविण्यासाठी एक काम नाही.
मोदी सरकारची (Modi Government) कामे या सरकारला दाखवावी लागतात.
जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही यांची सारखी तीच ओरड असते. पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी करायला तयार नाही.
पण या सरकारला इंधनाचे भाव कमी करायला लागतील.

 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या सहा जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते.
पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि ‘सिक्रेट बॅलेट वोट’ सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल.
सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असंही ते म्हणाले.

 

 Web Title :- Devendra Fadnavis | if mahaviaks aghadi take action on mlas who support bjp in rajya sabha election 2022 then mva govt will fall down says devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य

 

Chandrakant Patil | ‘देवेंद्र फडणवीस हे वेगळंच रसायन; त्यांच्या डोक्यात…’ – चंद्रकांत पाटील

 

Ravi Paranjape Passes Away | प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं 87 व्या वर्षी पुण्यात निधन