Devendra Fadnavis | अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

मुंबई : Devendra Fadnavis | राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), सदस्य नाना पटोले (Nana Patole), छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड,
जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर,
बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसन झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत,
अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Web Title : Devendra Fadnavis | Immediate relief will be given to farmers affected by unseasonal rains in 8 districts; Information of Deputy Chief Minister Devendra Fadnavis in the Legislative Assembly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन, लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; दुर्दैवी घटनेमुळे पुणे हळहळलं

Snehal Tarde | ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त 15 हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन