Devendra Fadnavis | ‘कोरोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Devendra Fadnavis | वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, असं महाविकास आघाडी सरकारमधील उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं आहे. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार निशाणा साधला आहे. एकीकीडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे, आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे. असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी ते आज पत्रकारांशी बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितलं, त्यातूनच हे लक्षात येतं की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली.
पणही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषता कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो.
त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळतं.
त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो.
त्यामुळे मला असं वाटतं की, या ठिकाणी जबरदस्ती वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय. असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आता निवडणुका लागल्या आहेत.
तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे.
तसेच, नाना पटोले (Nana Patole) जे बोलले आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे.
कारण, मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केलं आहे.
या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने नियुक्त केलं आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
असं देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | in corona too the government wants to recover like a lender so all this drama is started

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Delhi Police | दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन सक्सेस; PAK चा मोठा कट उधळला ! स्फोटकांसह 6 दहशतवाद्यांना केली अटक

Naseeruddin Shah | CM योगी यांच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावर संतापले नसीरूद्दीन शाह; म्हणाले…

Vijay Wadettiwar | ‘…तर मी राजीनामा देतो’ – मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा