शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या ‘त्या’ भूमिकेला भाजपचा धक्‍का

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमचाच मुख्यंमत्री होणार असल्याचे एकीकडे सांगत असताना शिवसेना देखील पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री होणार असे सांगत आहे. आज देखील भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांना सर्वांचा पाठिंबा आहे आणि भविष्यातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,’ असा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

युतीच्या दोन्ही पक्षांकडून या पदाबाबत दररोज नवनवीन वक्तव्ये समोर येत आहेत. शिवसेनेकडून एकीकडे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केले जात असताना भाजप नेते मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे सांगत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार होत आहे. नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,’ अशी भूमिका नुकतीच जाहीर केली. पण राम कदम यांच्या या वक्तव्याने उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला धक्का दिला आहे.

दरम्यान, काल शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू,’असे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हटले होते. मात्र त्यानंतर देखील भाजप आणि शिवसेनेच्या गोटातून याविषयी वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?