Devendra Fadnavis | ‘कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईल…’; देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील एका मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी (Vartak Nagar Police Station) जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना काल दुपारी अटक केली होती. त्यानंतर संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्येच घालवावी लागली. त्यांना आज ठाणे कोर्टाने (Thane Court) 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन (Bail) दिला. त्यांच्यावर मॉलमधील एका प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आव्हाडांवर टीका केली. कोणत्याही गोष्टीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आव्हाड करत असतात, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईलच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं अशा प्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. मुळात सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपटगृहात जो तमाशा केला, मारहाण केली त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. अटक झाली आहे, कुणीही अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता तरी हीच कारवाई झाली असती. कोणतीही वेगळी कारवाई झालेली नाही. पण आपण काहीतरी खूप मोठं केलंय, असं दाखवण्याच्या नादातून या गोष्टी होत आहेत”, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

याचवेळी त्यांना पत्रकारांनी ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पाच्या
(Energy Equipment Manufacturing Zone Project) अपयशाबद्दल विचारले असता ते म्हणाले,
‘या प्रकल्पाची पूर्ण टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government)
काळातली आहे. केंद्र सरकारने (Central Government) असे तीन पार्क करण्याचं ठरवलं आहे.
आता फक्त त्यातला एक दिला आहे. अजून दोन प्रकल्प यायचे आहेत.
केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रकल्प करत असते. सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले जातात.
पण त्यातल्या एका किंवा दोन राज्यांत ते प्रकल्प मंजूर होतात. प्रत्येक वेळी महाराष्ट्रातून ते प्रकल्प गेले,
हा कांगावा करणं चुकीचं आहे. त्यात महाराष्ट्राची बदनामी होते.’

Web Title :- Devendra Fadnavis | jitendra awhad bail devendra fadnavis mocks on har har mahadev movie screening

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gujarat Elections | निवडणुकीआधी पुन्हा बाहेर आले 2002 चे भूत; भाजपकडून गुजरात दंगलीतील दोषीच्या मुलीला तिकीट

Navi Mumbai ACB Trap | अलिबागच्या लाचखोर महिला तहसीलदार मिनल दळवींकडे सापडले कोट्यवधींचं घबाड