Devendra Fadnavis | ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी कुर्ल्यात 3 एकर संपत्ती अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून केली खरेदी’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक वेगळ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर फडणवीसांनी मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. तसेच दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला.

त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘1993 बॉम्ब स्फोटातील जन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील तीन एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल अशी अंडरवर्ल्डच्या या गुंडांची नावे आहेत.

 

पुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 2003 साली हा सौदा सुरु झाला होता, नंतर 2005 साली हा सौदा पूर्ण झाला. 2.80 एकर म्हणजेच 1 लाख 23 हजार स्क्वेअर मीटर जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीने दाऊदच्या गुंडांकडून खरेदी केली. खरेदीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांवर फराज मलिक या व्यक्तीची सही आहे. ही जमीन मूळ गोवावाला यांच्या मालकीची होती. सलीम पटेल कोण आहे माहित नव्हतं का?, मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन खरेदी का केली?, 20 लाखांत 3 एकर जमीन तुम्हाला कशी काय दिली?, या आरोपींवर टाडा होता, तर टाडाच्या आरोपीची सगळी प्रॉपर्टी सरकार जप्त करतं. मग टाडाच्या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असा सवाल त्यांनी केला.

हे देखील वाचा

Earn Money | दररोज होईल 4,000 ते 5,000 रुपयांची कमाई, सुरू करा ‘हा’ बिझनेस; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

PV Sindhu ने ’Love Nwantinti’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, वायरल झाला Video

Rupay New Debit Card | प्री-टीनएजर्स आणि टीनएजर्ससाठी RuPay ने लाँच केले नवीन डेबिट कार्ड, जाणून घ्या कशा असतील सुविधा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | BJP Leader devendra fadnavis unveils nawab maliks family bought 3 acre property kurla underworld goon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update