Devendra Fadnavis – LuLu Group | लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट; अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा

मुंबई :- Devendra Fadnavis – LuLu Group | लू लू ग्रुपचे सीओओ,आरडी रेजिथ राधाकृष्णन (Rejith Radhakrishnan – LuLu Group International) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली. (Devendra Fadnavis – LuLu Group)

यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर (Deepak Kapoor IAS), सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी (IAS Dr. Sanjay Mukherjee), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन शर्मा (IAS Dr. Bipin Sharma), उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी (IAS Shrikar Pardeshi), विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. (Devendra Fadnavis – LuLu Group)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी आधारित उद्योग तसेच अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. या क्षेत्रातील उद्योगांसाठी मोठ्या संधी आहेत. राज्यातील शेतकरी प्रयोगशील असून राज्यातील विविध शहरांमध्ये यासाठी इकोसिस्टिम तयार करण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योग समूहांना नक्कीच सहकार्य करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लू लू ग्रुपचे सीओओ,आरडी रेजिथ राधाकृष्णन म्हणाले, अन्न प्रक्रिया उद्योगांत विस्तार करण्यावर भर देण्यात
येत आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी
उत्सुक असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले.

मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक आणि नागपूर येथे माॅल्स उभारण्यासाठी ग्रुप उत्सुक असल्याचे तसेच नागपूर येथे अन्न प्रक्रिया युनिट उभारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच लवकरच ग्रुपचे अध्यक्ष भारतास भेट देणार असून त्यावेळी सामंजस्य करार करण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

हायपरमार्केट क्षेत्रातील हायपरमार्केट ! व्यवसायाचा प्रणेता

जगभरातील महत्वाच्या ठिकाणी यशस्वी व्यावसायिक संस्थांसह वैविध्यपूर्ण असा LuLu समूह आहे.
समूह आखाती प्रदेशाच्या आर्थिक स्थितीत एक प्रमुख योगदानकर्ता बनला आहे.
हायपरमार्केट ऑपरेशन्सपासून ते शॉपिंग मॉल डेव्हलपमेंट, वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार,
आदरातिथ्य मालमत्ता आणि रिअल इस्टेटपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात ग्रुप अग्रणी आहे.
LuLu समूह प्रामुख्याने मध्य पूर्व, आशिया, अमेरिका आणि युरोपमधील 23 देशांमध्ये कार्यरत आहे.
LuLu Group हा ‘LuLu Hypermarket’ या क्षेत्रातील हायपरमार्केट व्यवसायाचा प्रणेता आहे.
त्याने शॉपिंग मॉल्सचा पोर्टफोलिओ तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title :  Devendra Fadnavis – LuLu Group | Deputy Chief Minister Devendra Fadnavis received goodwill visit from Lu Lu Group COO Regith Radhakrishnan; Discussion on opportunities in food processing industry sector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी