कुणाला जमलं नाही ते CM देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, ३८ वर्षानंतर ‘हा’ विक्रम नोंदविला !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा नवीन विक्रम केला आहे. १९७२ नंतर मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासातील ते दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. १९७२ नंतर कोणताही मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हा एक नवीन विक्रम केला आहे. याअगोदर केवळ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच ११ वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यामध्ये त्यांनी एक टर्म ५ वर्षांची पूर्ण केली होती. त्यानंतर मागील ४२ वर्षांत कोणताही मुख्यमंत्री पाच वर्षाची सलग टर्म पूर्ण करू शकला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कठीण आव्हानांना तोंड देत सरकार चालवले. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि अनेक मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यांनी या सगळ्यांना धीराने तोंड देत आपले सरकार पुर्णपणे वाचवले. सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेना असो किंवा विरोधक सर्वांना अतिशय योग्यपणे हाताळत त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सरकार चालवले. त्यामुळे त्यांच्या या कालखंडाला विशेष महत्व आहे. मराठा आंदोलन, शेतकरी आंदोलन यांसारख्या घटना त्यांनी अतिशय उत्तमपणे हाताळत आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे विरोधकांसह स्वकीयांना देखील त्यांनी धीराने तोंड दिले.

महाराष्ट्राच्या कालखंडात कोण किती काळ पदावर

१) १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले.
२) वसंतराव नाईक हे सर्वात जास्त काळ म्हणजेच ११ वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर होते.
३) सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा पी. के. सावंत यांच्या नावावर आहे. ते अवघे १० दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते.
४) शरद पवार हे सर्वात जास्त वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. त्यांनी ३ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले परंतु एकदाही त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याचबरोबर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील होते.
५) दोघे पिता पुत्र मुख्यमंत्री बनण्याचा मान शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघांना लाभला.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय