Devendra Fadanvis | ’12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल, पण OBC मुद्यावर बोलत राहणार’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Devendra Fadanvis |विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) पहिल्याच दिवशी गोंधळ पहायला मिळाला. अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA Suspended) निलंबित करण्यात आलं आहे. 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण OBC मुद्यावर बोलत राहू, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसीच्या मुद्यावरुन आम्ही सरकारला उघडे पाडले आहे. त्यामुळे खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित केले आहे. 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहिती

नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते, तरीही आतापर्यंत निलंबन झाले नाही. यावेळी कुणीही शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माफी मागूनही कारवाई केली गेली. निलंबनासाठी स्टोरी तयार केली गेली, असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

1. गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
2. आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
3. डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद
4. अभिमन्यू पवार, औसा, लातूर
5. अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
6. पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
7. राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
8. हरीश पिंपळे, मूर्तिजापुर, अकोला
9. जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
10. योगेश सागर, चारकोप, मुंबई
11. कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर
12. नारायण कुचे, बदनापूर, जालना

Web Title : Devendra fadnavis | maharashtr  assembly session 2021 vidhan sabha lop devendra fadnavis allegation on maha vikas aghadi after bjp mlas suspended

 

हे देखील वाचा

Woman Care | ‘हे’ ६ पौष्टिक घटक महिलांना अनेक आजारांपासून रक्षण देतात, जाणून घ्या

Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

Cesarean Delivery | ‘सिझेरियन’नंतर महिलांचा आहार कोणता असावा? जाणून घ्या काय खावे आणि काय नाही