Devendra Fadnavis | राज्यपाल कोश्यारींसह देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाणार, राज्यपाल बदलीवर चर्चा होणार?

मुंबई : Devendra Fadnavis | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जाणार आहेत. त्यामुळे राज्यपाल यांची कानउघडणी पक्षश्रेष्ठी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Devendra Fadnavis)

गेले दोन दिवस राज्यात राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर अपमानकारक भाष्य केल्याने वाद सुरु आहेत. राज्यपालांना हटविण्याची मागणी सर्व पक्ष करत आहेत. त्यामुळे हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यपालांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या दिल्ली भेटीत राज्यपाल बदलण्याची शक्यता आहे. तशी चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी देखील मला वय आणि तब्येतीच्या कारणांमुळे जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी पक्षाला सांगितले आहे. त्यामुळे एकीकडे राज्यपालांच्या विधनामुळे सर्व पक्षांमध्ये रोष आहे, तर दुसरीकडे राज्यपाल पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. त्यामुळे त्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. किंवा नेहमीप्रमाणे ते माफी मागून आपल्या पदावर कायम राहतील. (Devendra Fadnavis)

राज्यपालांना हटविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे पक्षांनी केली आहे.
तसेच भाजपच्या देखील खासदाराने ही मागणी केली आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पदावरुन हटविण्यासाठी पक्षाला पत्र दिले आहे. तसेच त्यांना हटविले नाही, तर मी पक्ष वैगरे पाहणार नाही. मी माझ्या पद्धतीने न्याय करेन, असे भोसले म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना हटविले नाही, तर महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात गोष्टी चिघळण्याची शक्यता आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra governor bhagatsingh koshyari and dy cm devendra fadnavis is on delhi tour

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

यावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे