Devendra Fadnavis | शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, – गृहमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंड झाले आणि 50 पेक्षा जास्त आमदार आणि 12 खासदार त्यांच्यासोबत गेले. आता या सर्व आमदार आणि खासदारांच्या सुरेक्षत वाढ करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. या सर्व आमदार आणि खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा (Y Plus Security) देण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदेश दिले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याने ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक नेत्यांची आणि आमदारांची सुरक्षा काढून घेतली होती.

शिंदे यांच्या गटातील 41 आमदार आणि 10 खासदार यांच्यासाठी वाय प्लस दर्जाची सुरक्षा करण्यात आली आहे. परंतु त्तपूर्वी ठाकरे गटाच्या अनेक आमदारांची आणि नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यात संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा समावेश होता. यापैकी भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर सुरक्षा काढून घेण्यात आली त्याच दिवशी हल्ला देखील करण्यात आला होता. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात येत असून, दुसरीकडे शिंदे यांच्या गटातील आमदारांची सुरक्षा वाढविण्यात येत आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan),
शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) आणि राष्ट्रावादीचे
अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या देखील सुरक्षा कायम आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे,
त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra home department decides to give y plus security to mp mla of shinde faction shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा