Devendra Fadnavis | राज्यातील नेत्यांचा दौरा टाळल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री बचावात उतरले; म्हणाले, “त्या दिवशी एखादं आंदोलन होणं योग्य नाही”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई सीमाप्रश्नासंबंधी कर्नाटक दौरा करणार होते. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे वक्तव्य केले. त्यानंतर सदर आशयाचे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवले. त्यानंतर महाराष्ट्राच्या नेत्यांचा कर्नाटक दौरा टाळला. त्यानंतर शिंदे फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर सर्वत्र टीका होत होती. आता सरकारच्या बचावासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उतरले आहेत.

 

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात खटला या संदर्भात सुरू आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यही या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. या संदर्भात जो काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयच घेणार आहे. मला असं वाटतं की विनाकारण या संदर्भात नव्याने कुठलातरी वाद निर्माण करणे, हे योग्य होणार नाही. महाराष्ट्र अतिशय ताकदीने आपली बाजू मांडत आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल, हा विश्वास ठेवला पाहिजे.”

परत मुद्द्यावर येत फडणवीस म्हणाले, “मंत्र्यांचा दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता आणि एका कार्यक्रमासाठी आपले मंत्री तिथे जाणार होते. या संदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे, महाराष्ट्राचही काही म्हणणं आहे. आपल्या मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही.
परंतु महापरिनिर्वाणदिनी आपण अशाप्रकारचा वाद तयार करायचा का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून यासंदर्भात काहीना काही विचार आम्ही करत आहोत,
मुख्यमंत्री या संदर्भातील अंतिम निर्णय आम्हाला देतील.
पण आमचं प्राथमिक मत आहे की, महापरिनिर्वाण दिन हा आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे
आणि त्या दिवशी एखादं आंदोलन होणं, एखादी चुकीची घटना घडणं हे योग्य नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

याशिवाय फडणवीस म्हणाले, “आपल्याला भविष्यातही त्या ठिकाणी जाता येईल.
आपल्याला तिथे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आपल्यात कोणी घाबरतही नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की, स्वतंत्र भारताच्या कोणत्याही भागात कोणीही कोणाला थांबवू शकत नाही.
हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
मात्र, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्या दिवशी काय करावं यासंदर्भात चर्चा सुरू आहे,
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra karnataka border dispute if the ministers decide no one can stop them from going devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या