देवेंद्र फडणवीस यांना आता WHO मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलीसनामा ऑनलाईन  : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टीका केलीय. कोरोनाच्या काळात राजकारण करू नका, अशी विनंती केली असतानाही  देवेंद्र फडणवीस राजकारण करण्याचं सोडत नाहीत. त्यांना ‘डब्ल्यूएचओ’मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील, अशी खरमरीत टीका  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलीय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्य सरकारमध्ये कुठलाही समन्वय आढळून येत नाही. मुख्यमंत्री प्रशासनावर अवलंबून आहेत. त्यात काहीही चूक नाही. पण,  आता प्रशासनाला नेतृत्व देण्याची आवश्यकता मात्र, ह्या अपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण होत नाहीत. खूप सावधपणे, संभाळून पावले उचलत असल्यामुळे निर्णय होत नाहीत. याला उद्धव ठाकरे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिलेे आहे.

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणूचं संक्रमण रोखणं, त्याचा वेग कमी करणे आवश्यक आहे.  गर्दी टाळा, हात धुवा, मास्क लावा आणि  नियम पाळा, असे सांगितले जात आहे. मात्र, याचं किती लोक पालन करतात, हा मुद्दा आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करावे लागले. कारण, तेथे संक्रमण वाढले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, चष्मा लावायला हरकत नाही पण, डोळ्यावर झापडं लावू नका. आपण करोनाच्या काळात रुग्णालये उभारलीत. सगळ्या उपाययोजना केल्या आहेत.