Devendra Fadnavis Meet MNS Raj Thackeray | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात 2 तास बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis Meet MNS Raj Thackeray | आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ’शिवतीर्थ’ निवासस्थानावर त्यांची भेट घेतली. सुमारे 2 तासाच्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली यावर सध्या विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मनसेला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मंत्रिपद दिले जाऊ शकते अशी चर्चा असतानाच काल राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्याचे खंडन केले होते. त्यानंतर आज ठाकरे-फडणवीस यांची भेट झाली आहे.

 

राज ठाकरे यांच्या मनसेने काही महिन्यांपूर्वी अचानक आपल्या इंजिनाचा मार्ग बदलत हिंदुत्ववादी ट्रॅकवर धावण्यास सुरुवात केली आहे. मनसेने मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम असे विषय हाताळण्यास सुरूवात केली आहे. दरम्यानच्या काळात मनसे-भाजपाची जवळीक सुद्धा वाढली आहे. नुकत्याच झालेल्या बहुमताच्या चाचणीत मनसेच्या एका आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिले होते. (Devendra Fadnavis Meet MNS Raj Thackeray)

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवले होते.
फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरे यांच्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांचे फोन करून आभार मानल्याचे सांगितले होते.
तसेच मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचेही म्हटले होते.
शिवाय या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका असेही फडणवीसांनी म्हटले होते.
त्यानंतर आज ठाकरे-फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.

 

बंडखोरीनंतर हादरलेल्या शिवसेनेला आणखी खच्ची करण्यासाठी राजकीय हल्लाबोल करण्यात शिंदे गट आणि भाजपासह मनसेसुद्धा आघाडीवर असल्याचे सातत्याने दिसत आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मदतीने शिवसेनेला मागे टाकण्यासाठी भाजपा मनसेशी जवळीक साधत राजकीय खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title :-  Devendra Fadnavis Meet MNS Raj Thackeray | BJP leader and deputy chief minister devendra fadnavis reached shivatirth for met mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा