Devendra Fadnavis | परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरुय, CBI चौकशी झाली पाहिजे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | आरोग्य विभागाच्या परीक्षेचे (Health department exam) पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज (रविवार) होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर (Mhada Exam) फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे म्हाडाकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. यावरुन भाजपने (BJP) राज्य सरकारवर (maharashtra government) जोरदार टीका केली आहे.

 

म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी (CBI inquiry) झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तसेच परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

काळा कारभार सातत्याने चाललाय

ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करुन, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार (Corruption) या परीक्षांमध्ये सुरु आहे.

 

 

पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे

सामान्य युवकांची फरपट सुरु असून त्यांचा आक्रोश सुरु आहे. त्यामुळे सरकारने यावर कडक कारवाई (Strict action) केली पाहिजे. सरकारमध्ये कोण दोषी आहे? कुणावर तर दोषारोप झाला पाहिजे. कोणावर दोषारोप देखील होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री (CM) नामानिराळे हे चालणार नाही. फार मोठा रोष या संदर्भात आहे, याची कडक कारवाई झाली पाहिजे. आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.

 

किमान विद्यार्थ्यांची अशी थट्टा तर करु नका

आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालय पर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तोच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द (Exam canceled) करण्याची वेळ! सरकारी भरतीचा (Government recruitment) हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी (Job) देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करु नका! दोषींवर कठोर कारवाई कराच! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | mhada exam paper leak case should be investigated by cbi demand of Devendra Fadnavis  Join our

WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 699 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nora Fatehi-Guru Randhava Dating | गुरू रंधावासोबत गोव्यात मस्ती करताना दिसली नोरा फतेही; नेटकरी म्हणाले – ‘पंजाबला अजून एक सून भेटली’

Wrestling Competition | शिवराय कुस्ती संकुलच्या मोईन पटेलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड