Devendra Fadnavis | म्हाडाच्या प्रकल्पांना गती द्या, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार 120 सदनिकांची देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन सोडत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने (MHADA Pune) घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत.

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना (MHADA Housing Scheme), 20 टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) (शहरी) अंतर्गत पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (PCMC) शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3 हजार 120 सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (Anil Diggikar), गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह (Valsa Nair Singh), पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने – पाटील (Nitin Mane – Patil), ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या 6 हजार 58 सदनिकांसाठी 58 हजार 467 अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील 2 हजार 938 सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. 3 हजार 120 सदनिकांसाठी 55 हजार 845 अर्ज प्राप्त झाले.

म्हाडा सोडतीचा आढावा

एकूण सदनिका – 6,058
एकूण प्राप्त अर्ज – 58,467
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- 2,938
20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना – 2,483
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) – 637
एकूण सदनिका – 3,120
एकूण प्राप्त अर्ज – 55,845

Web Title :  Devendra Fadnavis | mhada-projects-speed-up-order-to-deputy-chief-minister-fadanvis-pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osho Sambodhi Divas | ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

Pune Metro News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो एप्रिलपासून गरवारे ते रुबी हॉल धावणार

Old Pension Scheme News | ‘कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर सुविधांचे तत्व आम्ही मान्य केले, मात्र…’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं (व्हिडिओ)