Devendra Fadnavis | ‘ती’ माहिती कशी लीक झाली?’ मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अशातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi Government) निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस (Notice) पाठवल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

 

पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या घोटाळ्याबाबतची माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना (Union Home Secretary) दिली होती. राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा (Police Officer Transfer Scam) मी समोर आणला होता. न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत सीबीआय Central Bureau of Investigation (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ऑफिशिअल माहिती (Official information) लीक कशी झाली याचा एफआयआर (FIR) दाखल झाला आणि मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. मला विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition) असल्याने माहितीचा स्त्रोत विचारला जावू शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली असून सायबर पोलीस (Mumbai Cyber police) ठाण्यात बोलावलं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं.

 

राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली याबाबतचे पुरावे (Evidence) माझ्याकडे आहेत.
पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार आणि त्यांना सहकार्य (Cooperation) करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यासोबतच मी परवा राज्य सरकारने केलेल्या षडयंत्राचा (Conspiracy) मी भांडाफोड केल्याने त्यांना काही सूचत नसल्याने त्यांनी नोटीस पाठवली असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, दाऊदसोबत (Don Dawood Ibrahim) व्यवहार करणारे तुरूंगात जाऊनही अद्याप महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) आहेत याची मला खंत असल्याचं म्हणत पुन्हा फडणवीसांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरून सरकारवर टीका केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | mumbai cyber police send notice to bjp leader devendra fadnavis about police officers transfer case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा