Devendra Fadnavis | “गृहमंत्री साहेब राजीनामा द्या,” पुण्यात राष्ट्रवादीने लावले फडणवीसांचे बॅनर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पुण्यात (Pune News) अनेक वेगवेगळ्या कारणावरून बॅनरबाजीची चर्चा पाहायला मिळते. काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री (CM) आणि नुकतेच लोकसभा पोटनिवडणुकीवरून (Lok Sabha By-Election) भावी खासदार, अशा आशयाचे बॅनर पुणे शहरासह परिसरात झळकले होते. यावरून अनेक राजकीय चर्चा देखील रंगल्या होत्या. आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे बॅनर पुणे शहरात झळकत आहे. हे बॅनर राष्ट्रवादीच्या नेत्याने लावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमध्ये काही सवाल देखील उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याचीही (Resignation) मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप हूमे (Pradeep Hume) यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यांनी बॅनरमधून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नेमके बॅनरमध्ये काय लिहिलेय?

– महाराष्ट्र सुरक्षित आहे का?

– इथे महिला सुरक्षित नाहीत…चालू लोकलमध्ये बलात्कार

– (Traders are not safe here) इथे व्यापारी सुरक्षित नाहीत… खंडणीखोर व कोयता गँगची दहशत

– इथे नेते सुरक्षित नाहीत… विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे

-(Journalists are not safe here)  इथे पत्रकार सुरुक्षित नाहीत… पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जाते

– इथे रोज जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय…तरीही कुठलीही ठोस कारवाई नाही.

– भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे…

वारंवार घडणा-या घटनांमुळे नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये, असा सवाल करण्यात आला आहे.

Web Title :  Devendra Fadnavis | ncp put up devendra fadnavis banner in pune demanded his resignation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या