देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी केली हार्दिक पांड्याला बॉलिंग अन्… (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर खासदार क्रिडा महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा खेळ पाहून असं दिसून आलं की, आपल्या भाषणातून विरोधकांना धारेवर धरण्याची कला असणारे दोघे नेते क्रिकेटमध्ये गुगली टाकण्यातही तितकेच तरबेज आहेत.

शुक्रवारी नागपूरमधील खासदार क्रिडा महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानंही हजेरी लावली होती. या महोत्सवात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि हार्दिक पंड्या यांचा सामना रंगताना दिसून आला.

खासदार क्रिडा महोत्सवात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी गोलंदाजी पसंत केली तर हार्दिक पंड्यानं फलंदाजी पसंत केली. यावेळी तिघांचा सामना रंगताना दिसला. गडकरी आणि फडणवीस यांनी टाकलेल्या चेंडूंवर हार्दिक पंड्यानंही जोरदार फटकेबाजी केली. नागपूरकरांना एका मुव्हमेंटला जास्तच आनंद वाटला. कारण देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला एक चेंडू हार्दिकलाही खेळता आला नव्हता. यावेळचा एक व्हिडीओ देखील समोर आला आह जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –