
Devendra Fadnavis On Aaditya Thackeray | बालबुद्धीवर काय बोलणार?, देवेंद्र फडणवीस यांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Aaditya Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखांनी दिलशहाचा सरदार अफजल खानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला होता. शिवाजी महाराजांची वाघनखे सध्या इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयात असून ते महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या वाघनख्यांवरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरुन सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. फडणवीस यांनीही आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. (Devendra Fadnavis On Aaditya Thackeray)
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की फक्त शिवकालीन आहेत? याबाबत राज्य सरकारने (Maharashtra State Government) खुलासा करावा. तसेच ही वाघनखं किती वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली जात आहेत? याबाबतही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरुन शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मुंबई येथील शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. (Devendra Fadnavis On Aaditya Thackeray)
बालबुद्धीवर काय बोलणार?
आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. त्या प्रश्नला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पुरावे मागणं ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मी बालबुद्धीवर काय बोलणार? अशा शब्दात फडणवीस यांनी जहरी टीका केली.
मनं साफ करून घ्यावीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची एकत्रित बैठक पार पडली. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तर त्यात नवल काय आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त इंडिया आघाडीने (India Alliance) मार्चचं आयोजन केलं आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. या निमित्ताने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वत:ची मनं साफ करुन घ्यावीत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | आई-वडिलांच्या भांडणात पाकिस्तानी असलेल्या तरुणाची ‘ससेहोळपट’?; ‘पाकिस्तानी’ म्हणून केली अटक
- Ramesh Bagwe | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा राज्यभर लढा उभारू – रमेश बागवे
- Sukesh Chandrasekhar | 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर येणार सिनेमा? कोण साकारणार भूमिका