Devendra Fadnavis on Aditya Thackeray | मी हिंदू, मागील जन्मावर आणि पुनर्जन्मावर विश्वास, 1857 च्या युद्धातही लढत असेन; देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on Aditya Thackeray | बाबरी मशीद पाडली (Babri Masjid Demolition) त्यावेळी मी तिथे हजर होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठकारे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोमणा लगावला होता. 1857 च्या युद्धातही फडणवीसांचे चांगले योगदान असेल, असा टोला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लगावला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मात मी असेल तर 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे (Tatya Tope) आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या (Rani Laxmibai Jhansi) बाजूने लढत असेल. तुम्ही असाल तर त्या ही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत (British) युती (Alliance) केली असेल. असे म्हणत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

 

आदित्य ठाकरे यांच्या टोमण्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मर्सिडीज बेबी म्हणत आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) खिल्ली उडवली. ते म्हणाले, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीज बेबींना (Mercedes Baby) ना कधी संघर्ष करावा लागला आहे, ना कधी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात, असे फडणवीस म्हणाले.

 

 

माझा पुनर्जन्मावर विश्वास

आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली ( Babri Masjid Demolition) गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे.
त्यावेळीच मी नगरसेवक (Corporator) होतो. मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे.
त्यामुळे मागील जन्मात मी असेल तर 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे (Tatya Tope) आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या (Rani Laxmibai Jhansi) बाजूने लढत असेल.
आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत (British) युती (Alliance) केली असेल.
कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे 1857 च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते शिपायांचं बंड होतं,
असं म्हणतात, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

 

Web Title :- Devendra Fadnavis on Aditya Thackeray | devendra fadanvis taunt aaditya thackeray over 1857 indian rebellion statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा