Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस

मुंबई : Devendra Fadnavis On Chaskaman | पुणे जिल्ह्यातील शिरुर (Shirur Taluka News) व खेड तालुक्याला (Khed Taluka News) वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास 1356 कोटीं रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य अशोक पवार (MLA Ashok Pawar), दिलीप मोहिते-पाटील (MLA Dilip Mohite Patil), राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चासकमान प्रकल्पाचे (Chaskaman Dam Project) काम पूर्ण होणे
गरजेचे आहे. या कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.
तसेच अतिक्रमणाबाबतही काही तक्रारी आहेत,त्याची चौकशी करण्यात येईल.
जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या कामाचेही सर्वेक्षणाचे काम सुरु असून, त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल,
असेही उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis On Chaskaman) यांनी सांगितले.

Web Title : Devendra Fadnavis On Chaskaman | Revised administrative approval for Chasakaman Canal work soon – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं, पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव