Devendra Fadnavis On Kukadi Project | कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Kukadi Project | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Pune) पश्चिम आदिवासी भागातील 12 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Kukadi Project) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

 

याबाबत सदस्य महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis On Kukadi Project) म्हणाले, या आदिवासी भागातील गावांना कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाच्या जलाशयावरुन शेतीसाठी कळमजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती. त्यानुसार या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याप्रकल्पासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल आणि उपलब्ध पाणीसाठा याचा अंदाज घेऊन या 12 गावांच्या आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल.

 

जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश (Inclusion of additional villages in the benefit area by looking at the availability of water in the Jigaon project)

जिगाव प्रकल्पात (Jigaon Project) मोठी सिंचन क्षमता तयार करण्यात येत आहे.
यामध्ये अधिक सिंचन क्षमता उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले
तर मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे या लाभक्षेत्रात समाविष्ट करुन त्यांना लाभ देता येईल,
असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

 

याबाबत सदस्य संजय सावकारे (Bhusawal MLA Sanjay Savkare) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मलकापूर विधानसभा मतदार संघातील (Malkapur Assembly constituency) 14 अतिरिक्त गावे लाभक्षेत्राबाहेरील आहेत.
या गावांचा समावेश या प्रकल्पात करत असताना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असणे महत्वाचे आहे.
म्हणून पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाला निधी देण्यात येईल,
त्यानंतर या गावांना लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Kukadi Project | 12 villages in tribal areas will be relieved by reallocating Kukdi project water – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन