Devendra Fadnavis On Mumbai Mill Workers Home | मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : Devendra Fadnavis On Mumbai Mill Workers Home | मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Mumbai Mill Workers Home) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.
याबाबत सदस्य सुनिल राणे (MLA Sunil Rane), प्रकाश अबिटकर (Radhanagari MLA Prakash Abitkar), सदा सरवणकर (Mahim MLA Sada Sarvankar), कालिदास कोळंबकर (Wadala MLA Kalidas Kolambkar) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बोर, धाम प्रकल्पातील दुरुस्ती कामांना गती (Acceleration of repair work in Bor, Dham project)
वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) बोर व धाम हे सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प आहेत.
परंतु जुना प्रकल्प असल्याने कालवे व वितरण प्रणाली जीर्ण झाली आहे.
त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात येईल,
असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (Devendra Fadnavis In Vidhansabha) सांगितले.
याबाबत सदस्य पंकज भोयर (Wardha MLA Pankaj Bhoyar) यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी एका महिन्यात विस्तृत प्रकल्प विकास आराखडा
तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
Web Title :- Devendra Fadnavis On Mumbai Mill Workers Home | Government committed to provide rightful housing to mill workers in Mumbai – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update