Devendra Fadnavis on OBC Reservation | ‘आरक्षण असो किंवा नसो आम्ही…’; ओबीसींच्या तिकीटाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Election 2022) घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) आदेश दिल्याने महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Goverment) मोठा धक्का बसला आहे. राज्यात लवकरच स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसींच्या तिकीटाबाब मोठी घोषणा केली आहे.

 

राज्य सरकारने (Maharashtra State Government) या आरक्षणाची ठरवून कत्तल केली आहे. यामागे मोठं षडयंत्र असून 2010 साली पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं होतं. मात्र काँग्रेसने (Congress) काही केलं नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षण (OBC Reservation Maharashtra) असलं किंवा नसलं तरी भाजप 27 टक्के जागांवर ओबीसी उमेदवार (OBC Candidate) देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.

 

भाजपचा डीएनए (DNA) ओबीसी असून याच समाजाच्या जीवावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते (Devendra Fadnavis on OBC Reservation). यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

 

दरम्यान, महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्यावर या सरकारनं काहीचं केलं नाही.
याचिकाकर्त्यांनी ट्रिपल टेस्टचा (Triple Test) मुद्दा काढला.
सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट करुन त्याचा अहवाल न्यायालयासमोर मांडण्यास सांगितला.
13 डिसेंबर 2019 ला हा आदेश न्यायालयानं दिला आहे. मात्र सरकारने 15 महिन्यात काहीच केलं नसल्याचं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis on OBC Reservation | BJP leader devendra fadnavis alleges mahavikas aghadi government over obc political reservation maharashtra

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा