Devendra Fadnavis on President’s Rule In Maharashtra | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी का?’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on President’s Rule In Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण कोणत्या ना कोणत्या विषयावरून तापत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते राज्यात राष्ट्रपती राजवट (Demand Of President’s Rule In Maharashtra ) लागू करण्याची मागणी करत आहेत. भाजप नेत्यांनी (BJP leader) राष्ट्रपती राजवट मागणी लावून धरली असताना यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis on President’s Rule In Maharashtra)

 

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असेल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता सामान्य जनतेच्या मनातही तीच भावना आहे. भाजप हा लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीसुद्धा आपण राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचं सांगितलं होतं. यावर आता फडणवीस सारवासारव करत असल्याचं दिसत आहे. त्यासोबतच यावेळी बाेलताना फडणवीसांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) झालेल्या हल्ल्यावरून सरकारवर टीका केली.

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा (Z Security) असून त्यांनी आपण पोलीस ठाण्यामध्ये येणार असल्याचं कळवलं होतं.
तरीही त्यांच्यावर हल्ला होतो त्यामुळे याला पोलिसांचं समर्थन होतं किंवा पोलीस हे नाकाम झाले आहेत,
असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरही निशाणा साधला.

 

Web Title :- Devendra Fadnavis on President’s Rule In Maharashtra | presidents rule will impose in maharashtra read devendra fadnavis said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा