Devendra Fadnavis On Pune Kalyani Nagar Porsche Car Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक’, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांची पाठराखण (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Pune Kalyani Nagar Porsche Car Accident | पुणे शहरात रविवारी पहाटे घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्याशी फोनवर संपर्क साधून कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालयात पोहचले (Pune Police). त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी आयुक्तालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला सहज जामीन मिळण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता असे सांगितले.

पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात जी गंभीर घटना घडली आहे त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत लोकांमध्ये एक संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. या संदर्भात मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलं आहे, पुढची कारवाई काय त्यासोबत अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली, असे दवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातील सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची पाठराखण केली. पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं मोठं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता, यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्ष 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं, आणि 16 वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ड म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड अॅपिल्केशनही आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कलम 304 ए नाही तर हा कलम 304 च

कलम 304 ए नाही तर हा कलम 304 च आहे. अशा प्रकारे पोलिसांनी केलं होतं. दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि अडल्ट ट्रीट करण्याचा अर्ज सीन आणि फाईल्ड बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियल्ट अशाप्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा, डिअॅडिक्शन करा, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो होता, काय केलं आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

ज्युवेनाईल बोर्डाची आश्चर्यकारक भूमिका

अशा प्रकरणात पोलिसांनी पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात आहे, काय केलं, वयाचे पुरावे दिले, गाडीचे पुरावे दिले, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने आश्चर्यकारक भूमिका घेतली. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात सांगितले की बाबत ज्युवेनाईल कोर्टात जावं लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युवेनाईल बोर्डाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कार्टात जाऊ. या प्रकरणात जिथ पर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही

ज्यांनी अंडरएजला दारू दिली त्यांना पहिल्यांदा अटक केली. चार लोकांना अटक केली. त्यांना चार दिवसांची रिमाइंड दिलं. त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन लोकांचा मृत्यू होऊन त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही. पालकांनी देखील आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल हे काम केलं पाहिजे. पोलीस देखील या संदर्भात कडक कारवाई करतील. पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | ‘कुणालाही पाठीशी घालू नका’ पुणे हिट अँड रन प्रकरणात CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | व्हायरल व्हिडिओवर पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट, पण… (Video)

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ आला समोर, काय आहे व्हिडीओत? (Video)

Shrirang Barne On Ajit Pawar NCP | श्रीरंग बारणेंची नाराजी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, माझे काम केले नाही, अजितदादांना यादी… (Video)