Devendra Fadnavis On Pune Purandar Airport | पुरंदर विमानतळ जुन्याच जागेवरच – उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Pune Purandar Airport | पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) पुरंदर तालुक्यातील जुन्या जागेवरच होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी दिली. भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis On Pune Purandar Airport)

 

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमवेत चर्चा झाली. नवीन जागेला संरक्षण विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे आधीच्या निश्चित केलेल्या जागेला संरक्षण विभाग, विमानतळ प्राधिकरणासह सर्वप्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्याच ठिकाणी विमानतळ करावा असा विषय पुढे आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेला सर्व परवानग्या आहेत, त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रकल्पासाठीचे भूसंपादन केल्यास आपण लवकर पुढे जाऊ शकू.’

या विमानतळासोबतच बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) झाल्यास लाखो रोजगार तयार होतील.
पुण्याला आधुनिक विमानतळ देण्याकरिता बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासह विमानतळ अशा प्रकारचा विचार समोर आला आहे.
जमीन संपादनाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) करावे असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावू.
स्थानिकांशी चर्चा करून आराखडा पाठवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Pune Purandar Airport | Purandar Airport on the same site – Information of Deputy Chief Minister Fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

 

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

 

ACB Trap on PSI Dilip Sapate | 45 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात