Devendra Fadnavis On Pune Traffic Jam | पुण्याच्या वाहतूक कोंडीवर फडणवीसांनी सांगितला प्लॅन; उपाययोजनेबाबत दिली मोठी माहिती

Mahayuti Seat Sharing Formula | Devendra Fadnavis gave information about Mahayuti's seat allocation; Said - 'Our first list...'

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis On Pune Traffic Jam | शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. पुणेकरांचे अनेक तास या वाहतूक कोंडीत वाया जात आहेत. या वाहतूक कोंडीतून सुटका कशी होणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान याचे उत्तर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आज पुण्यात ७ नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “पुण्यात वाहतूक खूप वाढली आहे. यामध्ये अधिकारी वाढवायचा निर्णय घेतला आहे. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त देणार आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयोग होईल”, असे फडणवीसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आजच आपण सायबर सेंटर सुरू करत आहोत. साडे सातशे कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभे केले आहे. अनेकदा पैसे जातात येत नाही. मागच्या काळात आपण गुगल सोबत एक करार केला आहे, त्यात आता एआयचा उपयोग कसा करायचा, याचं काम पण सोपं आहे. ट्रॅफिकसाठी याचा उपयोग होणार आहे. त्यात सगळं शक्य आहे. ड्रोनचा वापरही केला जाणार आहे”, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न

Ajit Pawar NCP | आणखी दोन बडे नेते अजित पवारांची साथ सोडणार; तुतारी फुंकण्याचा घेतला निर्णय

Total
0
Shares
Related Posts