Devendra Fadnavis On Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech | ‘राज ठाकरे सत्यच बोलतात’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech | गुढीपाडव्याच्या (Gudipadva) मेळाव्यात मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ला चढवला. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना – भाजप युतीबाबत (Shivsena – BJP Alliance) बोलताना शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं खरं आहे. क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येवून सरकार चालवत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस हे काल यवतमाळ येथे आमदार मदन येरावार (MLA Madan Yerawar) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. मात्र ठाकरे यांचं भाषण संपूर्ण ऐकले नसल्याने यावर जास्त बोलणं योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

फडणवीस म्हणाले, राज ठाकरे बोलत आहेत ते एकप्रकारे सत्यच आहे. कारण एक क्रमांकाचा पक्ष सत्तेबाहेर पाहायला मिळत आहे आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे. मी त्यांचं पूर्ण भाषण न ऐकल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

 

काय म्हणाले राज ठाकरे ?
गुढीपाढवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

 

गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार ?
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, व्यासपीठावरुन तुम्ही एकमेकांना शिव्या घालता, नंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता.
शिवसेना – भाजप युती तुटली यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, अडीच वर्षाचं कारण सांगत युती तोडली.
या तुमच्या आपसातल्या गोष्टी आहेत, याच्याशी आमचा काय संबंध ? ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले ते भाजप – शिवसेना युती म्हणून केले.
शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. या मतदारांशी गद्दारी करणाऱ्याला कोणती शिक्षा देणार ?

 

Web Title :- Devendra Fadnavis On Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech | what raj thackeray is saying is true says devendra fadnavis on his gudi padwa melava speech

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा