Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवारांच्या ‘त्या’ आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Sharad Pawar | केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, आजकाल ही फॅशन झाली आहे की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामे त्यांनी केली आहेत, की त्याचे कोणतेही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)

 

फडणवीस पुढे म्हणाले की, मी विरोधकांना एवढाच सल्ला देईन की मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असू ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सवात (Ganesh Festival) अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचं ते दर्शन घेतात. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गणपतींचे दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचेही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचे वेगळे नाते आहे, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार…
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर
करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
पवार म्हणाले होते की, संजय राऊत (Sanjay Raut) सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते
म्हणून केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Sharad Pawar | bjp leader devendra fadnavis mocks ncp chief sharad pawar home minister of india amit shah mumbai visit bjp mns alliance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Headache | तणाव आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते डोकेदुखी, जाणून घ्या कोणती लक्षणे आहेत धोकादायक

 

Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

 

BJP Ashish Shelar | ‘आता तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ – आशिष शेलार