Devendra Fadnavis on Sharad Pawar | ‘शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का ?’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on Sharad Pawar | छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या राज्यसभा निवडणुकीवरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. ‘शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का ?’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

 

पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, ”शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का ? उलट संभाजीराजे यांना सन्मानाने राज्यसभेची उमेदवारी द्यावी,” अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

 

त्याचबरोबर फडणवीस यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ”संजय राऊत हे महत्त्वाची व्यक्ती नाही.” असं ते म्हणाले. तसेच नाना पटोले (Nana Patole) यांना स्मृतीभ्रंश झाला असल्याची टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

Web Title :- BJP leader devendra fadnavis say no one knows ncp chief sharad pawar roles maharashtra political news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा