Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर पुन्हा टीका, म्हणाले-‘संभाजीनगर हे नाव शरद पवारांना…’ (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात परिवर्तन झाले. (Maharashtra Politics News) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणार हे सरकार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Sharad Pawar) म्हणाले. सरकार आल्यानंतर वेगाने कामं सुरु केली. सगळ्यात महत्त्वाचं काम आपण केलं ते म्हणजे औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhajinagar) असं केलं. मात्र हे शरद पवार साहेबांना (Sharad Pawar) मान्य नाही, अशी टीका त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर येथे बोलत होते. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादचं (Aurangabad) नाव हे छत्रपती संभाजीनगर होणं तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी मोदी @9 या कार्यक्रमात नागरिकांना विचारल्यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं. त्यानंतर फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवार यांना मान्य नाही. ते म्हणाले तुम्ही नाव काहीही करा मी औरंगाबादच म्हणणार. पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलंत तरी छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीही विसरु शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आलो तेव्हा आपल्याला एक भेट दिली पाहिजे असं मला वाटलं. आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) हे एका योजनेचा पाठपुरावा करत होते. जी योजना गंगापूरचं चित्र बदलू शकते. ती म्हणजे गंगापूर उपसा सिंचन उपसा योजना (Gangapur Upsa Sinchan Yojana). 30 हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. 100 टक्के पाईप आणि ड्रीपने इथल्या शेतकऱ्यांचं भाग्य बदलणार आहे. आम्ही या योजनेला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. या योजनेच्या भूमिपूजनाला दिवाळीच्या पाडव्याला येऊ, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना या ठिकाणी येत आहे. सरकार कसं गतिमान आहे बघा. मागच्या म्हणजे उद्धवजींच्या सरकारमध्ये (Uddhav Thackeray Government) एकाही योजनेला फेरप्रशासकीय योजनेला मान्यता अडीच वर्षात दिली नाही. आम्ही एका वर्षात 35 योजनांना मान्यता दिली. साडेआठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल इतक्या योजनांना मान्यता दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)

फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

मोदींच्या नेतृत्वात भारत लोकशाही जिवंत आहेत आणि ती समृद्ध होते आहे, असं अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनीही सांगितले आहे. मोदींचे (PM Narendra Modi) सगळे विरोधक पाटण्याला एकत्र आले होते. पण मला सांगा यांच्याकडे एक नेता आहे का? जो मोदींच्या तोडीचा आहे? तुम्हाला सहा महिने राज्य देतो तुम्ही एक नेता ठरवून दाखवा. असंही आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या देशात एकच नेता आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Web Title : Devendra Fadnavis On Sharad Pawar | sharad pawar does not agree with changing the name of aurangabad to chhatrapaticsambhaji nagar said devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा