Devendra Fadnavis On Thackeray Government | ‘ठाकरेंनी पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ केलं’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Thackeray Government | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शनिवारी इंधन करकपात (Tax Deduction) केल्याने नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता राज्यातील इंधनावरील व्हॅट कमी करण्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला असल्याचे,” ते म्हणाले. (Devendra Fadnavis On Thackeray Government)
त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे.
स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 23, 2022
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकारने ‘राणाभीमदेवी’ थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक असल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम असल्याचं,” ते म्हणाले.
दरम्यान, ”इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चरसेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो,” असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Web Title : Devendra Fadnavis On Thackeray Government | BJP leader devendra fadnavis
claim mahavikas aaghadi thackeray government has not taken any decision to reduce petrol and diesel prices
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर