Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on Thackeray Government | मागील काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. संभाजीराजेंना आधी शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव होता. मात्र संभाजीराजेंनी तो अप्रत्यक्षपणे नाकारला. त्यानंतर शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. यानंतर आता भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. (Devendra Fadnavis on Thackeray Government)

त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी हा विषय आधी सुरू केला होता, त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही,” असं ते म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की पेट्रोल-डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये आहे. राज्याचा कर ते का कमी करत नाहीत? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करत आहे. 29 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात? याचं मला आश्चर्य वाटतं, ” असं ते म्हणाले.

Web Title : Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis targets shivsena on sambhaji raje chhatrapati rajyasabha election

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त