Devendra Fadnavis On Thackeray Government | ‘माझं मुंबईत घरच नाहीये, मी नशिबवान; अन्यथा…’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Thackeray Government | ‘मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नाहीतर मलाही नोटीस आली असती,’ असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) टोला लगावला आहे. तसेच, ‘राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे,’ असा सल्ला देखील त्यांनी दिला. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपने आज शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.

 

त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणुकीच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या सारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड. मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल. नाहीतर मलाही नोटीस आली असती. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला त्या ठिकाणी नोटीस आली नाही.” असं ते म्हणाले.

 

पुढे फडणवीस म्हणाले, “विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धी जागृत असल्याचा,” दावा त्यांनी केला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Thackeray Government | i am lucky that i do not have a house in mumbai otherwise i would have got notice devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा