Devendra Fadnavis On Thackeray Government | ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Thackeray Government | ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे, ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचे पाप आहे. मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही ? अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्याने आरक्षण रखडले असल्याचा,’ आरोप फडणवीस यांनी केला.

 

भाजपच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक (BJP Executive Meeting) सुरू आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, ”ओबीसी भाजपचा श्वास आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या करण्यात आली, अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं ओबीसी आरक्षण रखडलं, याचा रिपोर्ट तयार करण्यासाठी कोणीही तयार नसल्याचं,” ते म्हणाले.

 

पुढे फडणवीस म्हणाले, ”मोदी सरकारने (Modi Government) इंधनावरील कर कपात केली.
मात्र राज्यातील ठाकरे सरकारने मे महिन्यात एप्रिल-फूल केलं, इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर अधिक आहे,
आता इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

Web Title :- maharashtra state government april fool day in may agitation against thackeray government warning of bjp leader devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा