शरद पवारांबाबत मी ‘तसं’ म्हणालोच नव्हतो, देवेंद्र फडणवीसांनी दिला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी शरद पवारांचे राजकारण संपले असे कधीही म्हणालो नव्हतो. माझ्या मुलाखतीनंतर देखील मी या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले होते. असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

विधानसभे वेळी तुम्ही शरद पवारांचे राजकारण संपले असे विधान केले होते मात्र या विधानामुळे तुम्हाला फटका बसला का असे देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी शरद पवारांचे राजकारण संपले असे कधीही म्हणालो नव्हतो माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की, पवार ज्याप्रकाचे राजकारण चालवायचे त्या प्रकारचे राजकारण आता चालणार नाही कारण पिढी बदललेली आहे आणि या पिढीला तशा प्रकारचे राजकारण चालणार नसल्याचे मी सांगितले होते असा खुलासा फडणवीस यांनी केला.

मी त्या मुलाखतीदरम्यान हे देखील सांगितले होते की कोणीच कोणाचे राजकारण संपवत नाही असे म्हणत फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी अशा प्रकारची आघाडी होईल असे कोणालाच वाटले नव्हते अशा प्रकारचे स्पष्ट मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like