Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंसोबत दुरावा? फडणवीस म्हणाले ‘ त्यांचा जो चेहरा दिसतो त्याच्यात…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) व्यवस्थापक दिशा सालियान (Disha Salian Case) हिच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाकडून (SIT) तपास सुरु आहे. याप्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून (BJP Leader) सतत केला जात आहे. परंतु त्यासंदर्भातील पुरावे अद्याप समोर आले नव्हते. दुसरीकडे याप्रकरणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिचा खून केल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. अखेर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महायुतीच्या सरकारने (Mahayuti Govt) एसआयटीची स्थापना केली. यासंदर्भात फडणवीस यांना दिशा सालियान प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि तुमच्यात दुरावा निर्माण झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, दिशा सालियान प्रकरणात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. त्याची चौकशी सुरु आहे. जेव्हा ते सरकारमध्ये होते तेव्हा मी विरोधी पक्षानेता होतो. मी कोणाला घाबरत नव्हतो. पण त्यावेळी मी कधी याबाबत भूमिका घेतली नाही. त्यांचा अहंकार हा एवढा मोठा आहे की, त्यांच्यासमोर काहीही करा तरी तुम्ही शून्यच असता. दुखावलो गेल्याचा प्रश्न नाही.

जेव्हा तुम्ही कुणासाठी जगातल्या सर्व गोष्टी करता त्यानंतर ती व्यक्ती अशा पातळीवर जाते जिथे तुम्हाला,
तुमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो.
मी काचेच्या घरात राहत नाही त्यामुळेच कोणीही माझे काही बिघडवू शकत नाही.
अडीच वर्षाच्या कार्य़काळात यांनी माझ्या केसापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टींची चौकशी केली.
सपारी देऊन मुंबईत एक पोलीस आयुक्त माझ्या चौकशीसाठी बसवले.
त्यांचा जो चेहरा दिसतो आणि जो आहे त्याच्यात खूप फरक आहे. त्यांचे दोन चेहरे आहेत.
समोर नसलेल्या चेहऱ्यामध्ये अहंकार भरला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)