Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरुन देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले- ‘त्यांना संसदेत कोण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर (New Parliament Building Inauguration) विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray Group) देखील समावेश आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी खोचक टोला लगावला. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

 

संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र उद्घाटन राष्ट्रपतींच्या (President) हस्ते का होत नाही असा सवाल करत 19 विरोधी पक्षांनी उद्घाटनावर बहिष्कार (Boycott) घालण्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि ठाकरे गटही सामील आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

 

आमचा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला विरोध असून मी संसद भवनात जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांना कोण घेऊन जातंय, त्यांना जी जागा दिली होती, तिथेच ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत, दोन तासांच्या वर तिथे बसत नाहीत, त्यांना कोण लोकसभेत बोलवतंय? आणि कोण त्यांना संसद भवनात बोलावणार आहे? या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही.

 

सरकारकडून उद्घाटनाची जोरदार तयारी

विरोधकांनी उद्घाटनावर बहिष्कार घातला असताना दुसरीकडे सरकार मात्र 28 च्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करत आहे.
दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा राजदंड (Scepter of the Chola Empire) नव्या संसदेत स्थापित केला जाणार
असल्याची माहिती अमित शाह (Amit Shah) यांनी दिली. सत्तेचं हस्तांतरण करण्यासाठी हा राजदंड दिला जायचा.
ब्रिटिशांच्या तावडीतून देश स्वतंत्र होत असतानाही हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरुंना (Pandit Jawaharlal Nehru) दिला होता.
नव्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड प्रस्थापित केला जाणार आहे.

 

 

 

Web Title :  Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | new parliament building row who is inviting
uddhav thackeray to the inauguration of the new parliament building taunts devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा