मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis On Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज एनडीए सरकारचा (NDA Modi Govt) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावरून आता विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामधून काहीही मिळाले नाही, अशी टीका महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली आहे.
तसेच केंद्र सरकारच्या विरोधात खासदारांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करत विरोधकांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळालं? याची यादीच त्यांनी वाचून दाखवली आहे.
फडणवीस म्हणाले, ” केंद्रीय अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. अनेक प्रगत देश अर्थव्यवस्थेशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत भारताने ८.२ टक्क्याची वाढ दाखवली आहे. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करुन देणारी वाढ आहे.
२०२३-२४ मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च दुप्पट झाला असून जवळपास ११ लाख कोटी वरून २३ लाख कोटीवर गेला आहे. तसेच आरोग्य क्षेत्राचा खर्च २०१७-१८ च्या तुलनेत आता जवळपास दुप्पट झाला आहे. २.५ लाख कोटीवरून ५.८५ लाख कोटीवर गेला आहे “, असे फडणवीसांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विविध तरतुदींवर भाष्य करत विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, ” या अर्थसंकल्पाची थीम पूर्वेकडील राज्याच्या धर्तीवर घेतली. त्यामुळे देशातील काही राज्यांची नावे आली. लगेचच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्प न वाचता घोषणाबाजी केली आणि प्रतिक्रिया दिल्या. पण मला असं वाटतं की जनता जेव्हा तुम्हाला निवडून देते तेव्हा एवढी अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत. मी पाहिलं तर मला महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे दिसून आले ”, असे फडवणीस यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले ?
विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प – ६०० कोटी
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार – ४०० कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर – ४६६ कोटी
पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प – ५९८ कोटी
महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प – १५० कोटी
MUTP-३ – ९०८ कोटी
मुंबई मेट्रो – १०८७ कोटी
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर – ४९९ कोटी
एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी – १५० कोटी
नागपूर मेट्रो- ६८३ कोटी
नाग नदी पुनरुज्जीवन – ५०० कोटी
पुणे मेट्रो – ८१४ कोटी
मुळा मुठा नदी संवर्धन – ६९० कोटी
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Mahayuti-Shivsena-BJP | मुख्यमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात जुंपली; महायुतीत वाद?