Devendra Fadnavis | ‘बायकोनं मारलं तरी हे लोक मोदींनाच जबाबदार धरतील’ (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभर भाजपच्या (BJP) वतीने ओबीसी आरक्षणासाठी (OBC reservation) आज चक्काजाम आंदोलन केले जात आहे. तर नागपूर येथे देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas aghadi government) नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही. हे सरकार एकमेकांचे लचके तोडायला तयार आहे. ज्याठिकाणी नापास झाले तिथे मोदीजींने हे करायला पाहिजे होते, असे एका सुरात बोलतात. एखाद्या दिवशी यांच्या बायकोने मारले तर मोदींनाच जबाबदार धरतील, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

यावेळी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘आमच्या काळात ओबीसीचे आरक्षण आम्ही टीकवले. 57 टक्के आरक्षणाने जिल्हा परिषद निवडणुका घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, या सरकारने हे लॅप्स केले. तुम्ही कायदा केला, तर त्या कायद्याने तुम्ही 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण वाचवू शकता आणि भाजपने 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण त्यावेळी वाचविले होते. तर आता मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), नाना पटोले (Nana Patole) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसी नेते मोदीजींनी इम्पिरिकल डेटा (Imperial data) दिला नसल्याचं सूर लावताहेत. काहीही झालं तरी मोदींनाच जबाबदार धरतात, असा टोला फडणवीस  यांनी लागवला आहे.

 

दरम्यान पुढे फडणवीस  म्हणाले, ओबीसीला संविधानात भाजपने जागा दिली. ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीने दिली नाही. आम्ही ओबीसीसाठी वेगळं खातं तयार केलं.
या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? तर दोन जणांनी ओबीसी आरक्षणविरोधात (OBC reservation) याचिका केली.
त्यापैकी वाशिम मधल्या काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडाऱ्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.
मग ओबीसी आरक्षण रद्द करणारे हे काँग्रेस आहे. असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Devendra Fadnavis | opposition leader devendra fadnavis criticized mahaviaks aghadi minister

हे देखील वाचा

Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक