Devendra Fadnavis | ‘लोकशाहीत कावीळ झाल्यासारखं वागणं…’ नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना (President) बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत. याबाबत विरोधकांनी पत्रक जारी केलं आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. कावीळ झाल्यासारखं वागणं बरोबर नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखं वागण हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन या देशाची शान आहे, या देशाची ताकदही आहे. जेवढ्या कमी वेळेत हे संसद भवन जेवढ्या भव्यतेने बनलं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मोदीजींना विरोध करण्याचा त्यांना ज्वर चढला आहे, असे लोक लोकशाहीच्या (Democracy) मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत, ते कारणं सांगत आहेत ती हस्यास्पद असल्याची टीका फडणवीसांनी केली.

 

फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वी 1975 साली लोकसभेच्या एनेक्स बिल्डिंगचं (Lok Sabha Annex Building) उद्घाटन इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी केलं होतं, मग ते लोकशाही विरोधी होतं का? संसदेतील लायब्ररी (Library of Parliament) आहे त्याचे भूमिपूजन राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी केलं होतं,
ते लोकशाही विरोधी होतं का? वर्षानु वर्ष नवीन संसद भवन बनवायची चर्चा होत होती, कुणी बनवू शकलं नाही,
ते मोदीजींनी बनवून दाखवं, त्यामुळे कुठेतरी पोटात दुखत आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

 

विरोधकांचा लोकशाहीवरही विश्वास नाही आणि लोकशाहीच्या मंदिरावरही विश्वास नाही.
ही फक्त भारताच्या लोकसभेची किंवा संसदेची इमारत नाही, ही इमारत नव्या भारताच्या ताकदीची इमारत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | opposition to boycott inauguration of new parliament building devendra fadnavis reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा